पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून महिला धावपटू दुती पुरुषांसोबत करते सराव

दुती चंद

भारताची आघाडीची धावपटून दुती चंदने टोकियो ऑलिम्पिकसाठी तयारीमध्ये येणाऱ्या अडचणी बोलून दाखवल्या. दिल्लीतील एका कार्यक्रमामध्ये तिने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्समध्ये ऐतिहासिक सुवर्ण पदक पटकावणारी दुती चंद ऑलिम्पिंकमध्ये देदिप्यमान कामगिरी करण्यासाठी पुरुषांसोबतच्या  सराव सत्रात मेहनत घेत आहे.

खेळापेक्षा खासगी आयुष्याला मिळणाऱ्या अधिक महत्त्वामुळे दुती चिंतेत

दुती म्हणाली की, महिला गटात तगडे स्पर्धेक नसल्यामुळे सध्याच्या घडीला मला भुवनेश्वरमध्ये पुरुषांसोबत सराव सत्रात भाग घ्यावा लागत आहे. समलैंगिकतेविषयीचा मुद्दा उपस्थित करत तिने टोकियो ऑलिम्पिकसाठी मिळायला हवे तसे प्रोत्साहन मिळत नसल्याची खंत देखील व्यक्त केली.  

समलैंगिक असल्याचं जाहीरपणे कबुल करणाऱ्या दुतीचं एलेनकडून कौतुक

दुतीने जकार्ता आशियाई क्रिडा प्रकारात १०० आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. नपोली येथील यूनिवर्सिटी क्रीडा प्रकारात तिने सुवर्ण पदक पटकावले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला धावपटू ठरली होती. दोहा विश्व चॅम्पियनशीपमध्ये महिलांच्या १०० मीटर शर्यत प्रकारात तिने ११.४८ वेळ नोंदवली. या स्पर्धेत तिला अपयशाचा सामना करावा लागला होता.