पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सेहवाग म्हणतो, जर सचिनची कॉपी केली असती तर...

सेहवाग -सचिन

जर मी सचिनला कॉपी करण्याचा प्रयत्न केला असता तर मला यशच मिळाले नसते, असे परखड मत भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले.  एकेकाळी क्रिकेटच्या मैदानात सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजासोबत भारताच्या डावाची सुरुवात करण्याची संधी मिळालेल्या वीरेंद्र सेहवागला स्फोटक सलामीवीर म्हणून ओळखले जाते. 

शेन वॉर्नने सांगितले, स्मिथ आणि विराटमध्ये कोण आहे सरस ?

सिंगापूरमध्ये 'एचटी मिंटच्या वतीने आयोजित आशिया लीडरशिप समिट मध्ये सेहवाग सहभागी झाला होता. यावेळी तो म्हणाला की, मी सचिनसारखा दिसू शकतो, त्याच्याप्रमाणे खेळू शकतो पण त्याच्यासारखी कामगिरी करु शकत नाही. जेव्हा मला ही गोष्ट समजली तेव्हा खेळण्याची शैली बदलली. आपल्या शैलीविषयी सेहवाग पुढे म्हणाला, तंत्रशूद्ध पद्धतीपेक्षा मी चेंडूवर तुटून पडण्यावर जास्त भर द्यायचो. या शैलीनेच मला ओळख मिळाली. जेव्हा माझे इतर सहकारी मैदानात काय चूक झाली याबद्दल विचार करायचे तेव्हा मी खेळाचा आनंद कसा घेता येईल या विचाराने पुढे चालायचो, असेही त्याने सांगितले. 

विराटने शेअर केला फोटो, ट्रोर्ल्सनी म्हटले चलन कापल्यानंतर झाले हे हाल

विरेंद्र सेहवागने १९९९ मध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. सुरुवातीला त्याला फारसे प्रभावीतकरता आले नाही. परिणामी त्याला संघातून बाहेर बसावे लागले. २००० मध्ये त्याने पुन्हा संघात पुनरागमन केले. त्यानंतर एकदिवसीय आणि कसोटीमधील स्फोटक फलंदाज अशी ओळख निर्माण केली.  सेहवागने कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात मिळून ८ हजारपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. भारताकडून कसोटीमध्ये तिहेरी शतक झळकवणारा सेहवाग पहिला भारतीय आहे. त्याने दोनवेळा हा पराक्रम केला आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Speaking at HT Mint Asia Leadership Summit 2019 Virender Sehwag says he could not have achieved success by trying to copy his idol Sachin Tendulkar