पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पैशांची अफरातफर प्रकरणात मेस्सी पुन्हा गोत्यात

मेस्सी

फुटबॉल जगतातील प्रतिष्ठित ‘बलॉन डी ओर’ पुरस्कार पटकवण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित करणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या अडचणी वाढणार आहेत. स्पॅनिश नॅशनल उच्च न्यायालयाने बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या स्टार विरोधातील आर्थिक फसवणूकीसंदर्भातील तपास पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.    

'बलॉन डी आर' पुरस्काराच्या षटकारासह मेस्सीचा नवा विक्रम

स्थानिक धर्मादायी संस्थेचे माजी कर्मचारी फेडरिको रेट्टोरी यांनी जूनमध्ये मेस्सीसह त्याचे वडील भाऊ आणि अन्य सदस्यांवर आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार दाखल केली होती. धर्मदायी संस्थेला मिळालेली देणगी मेस्सीच्या कुटुंबियाने वापरली आहे, असा अरोप रेट्टोरी यांनी केला होता. याप्रकरणात सप्टेंबरमध्ये न्यायालायाने पुराव्याच्या अभावी तपास बंद करण्याचे आदेश दिले होते. 

 

Video : अप्रतिम त्रिफळा उडवला, पण वहाबचाच 'बकरा' झाला

नॅशनल उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मारिया टार्डन यांनी रेट्टोरी यांच्या याचिका स्वीकारत मेस्सी विरोधातील तपास पुन्हा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारीच मेस्सीला फ्रान्सच्या फुटबॉल मॅग्जीनद्वारे सहाव्यांदा 'बॅलन डी ओर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. विश्वविक्रमाचा आनंदात असताना मेस्सी आर्थिक फसवणूकी प्रकरणातील अडचणी वाढल्या आहेत.