पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

South Asian Games: पदतालिकेत भारत टॉपला, आतापर्यंत मिळाली एवढी पदक

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारतीयांची दमदार कामगिरी

नेपाळमध्ये सुरु असलेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील सातव्या दिवशी भारतीय संघ १७८ पदकासह सर्वात अव्वलस्थानी आहे. आतापर्यंत भारताने विविध खेळ प्रकारात ८९ सुवर्ण, ६२ रौप्य आणि २७ कांस्य पदकाची कमाई केली आहे. यजमान नेपाळ  १२३ पदकांसह पदतालिकेत दुसऱ्या स्तानावर असून श्रीलंका संघ १४४ पदकासह तिसऱ्या स्थानावर आहे.  नेपाळच्या खात्यात  ४१ सुवर्ण असून श्रीलंकेच्या खात्यात २४ सुवर्ण आहेत. 

हा अति क्रिकेटचा परिणाम आहे का? ढिसाळ क्षेत्ररक्षणावर युवी संतापला

या स्पर्धेत अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताने दमदार कामगिरी केली. सहाव्या दिवसाअखेर भारतीय खेळाडूंनी एकूण ४९ पदकामध्ये २३ सुवर्ण, २० रौप्य तर ६ कांस्य पदकाची कमाई केली होती. भारतीय बॅडमिंटनमध्येही चांगली कामगिरी पाहायला मिळाली. महिला आणि पुरुष एकेरीमध्ये भारतीय खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी केली.

INDvsWI T20 : जिंकला नाही तरी चालेल पण, 'बलशाली' होऊन परता : लारा

बॅडमिंटन खेळ प्रकारात ६ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकासह भारताच्या खात्यात एकूण १० पदके मिळाली आहेत. महिला आणि पुरुष एकेरीत भारताने सुवर्ण कामगिरीसह टेबल टेनिसमध्ये भारताला ७ सुवर्ण, ५ रौप्य पदकासह एकूण १२ पदके मिळाली आहेत.