पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : असं कवा कुणी 'बोल्ड' होतं का राव!

सोशल मीडियावर रंगली ब्रॉडच्या विकेटची चर्चा

South Africa vs England: दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात न्यूलँडच्या मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉड अजब-गजब पद्धतीने बाद झाल्याचे पाहायला मिळाले. कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो ज्या पद्धतीने बाद झाला त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंरतर तुम्हालाही हसू आवरणार नाही.   

पूर्ण माहिती घेतल्याशिवाय सीएएवर बोलणार नाहीः विराट कोहली

प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा पहिला डाव पहिल्या दिवशीच २८९ धावांवर आटोपला आहे. पहिल्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात स्टुअर्ट ब्रॉडला कगिसो रबाडाने  तंबूचा रस्ता दाखवला. कगिसो रबाडाने टाकलेला चेंडू समजायला ब्रॉड पूर्णपणे फसला. रबाडाने सुरेख यॉर्करने त्याची मिडल स्टंप उडवली. रबाडाचा चेंडू स्टंपला लागणार नाही, असा अंदाज ब्रॉडने बांधला. कदाचित याच विचारातून त्याने चेंडू सोडून दिला. अन् तो मिडल स्टंपवर आदळला.  

टीम इंडियाचा अष्टपैलू इरफान पठाणची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

आघाडीच्या फलंदाजांच्या निराशजनक कामगिरीनंतर बेन स्टोक्स (४७) आणि ओली पॉपने केलेल्या नाबाद ६१ धावांच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या डावात २६९ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंड मालिकेत १-० असा पिछाडीवर आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला २२३ धावांवर आटोपत त्यांनी अल्प अघाडी घेतली असून सामना बरोबरी करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. यात ते यशस्वी होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

भारत विरुद्ध श्रीलंका : स्टेडियममध्ये बॅनर, पोस्टर नेण्यास प्रतिबंध

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाला सेंच्युरियनच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. यजमान आफ्रिकेने त्यांना १०७ धावांनी पराभूत केले होते. या दोन्ही संघामधी पुढील दोन सामने हे पोर्ट एलिझाबेथ आणि जोहन्सबर्गच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. यापूर्वी इंग्लंडचा संघ मालिकेत बरोबरी साधण्यास प्रयत्नशील असेल.