पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एबीच्या कमबॅकचा संभ्रम कायम, ड्युप्लेसीस-रबाडाला संधी

रबाडा आणि फाफ ड्युप्लेसीस

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. घरच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्यांसाठी फाफ ड्युप्लेसीस आणि कगिसो रबाडा यांना संघात स्थान देण्यात आले आहे.  शुक्रवारी २१ फेब्रुवारीपासून दोन्ही संघातील टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे.  या मालिकेतील सलामीचा सामना हा जोहान्सबर्गच्या मैदानात रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेनंतर दोन्ही संघात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळविण्यात येणार आहे.  

IPL 2020: साखळी फेरीतील सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर  फाफ ड्युप्लेसीसीने तिन्ही प्रकारातून कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. दुसरीकडे इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत रबाडाला विश्रांती देण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याला पुन्हा संघात स्थान मिळाले आहे. एनरिच नोर्टजे याला देखील संघात स्थान मिळाले आहे. मात्र लयीत असलेल्या टेम्बा बाव्हुमाला फिटनेस चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बाव्हुमाला स्नायू दुखापत उद्भवली होती.

अखेर धोनीचा ट्रेनिंग प्रोग्राम ठरला!  

दक्षिण अफ्रिकेचे प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी काही दिवसांपूर्वी  एबी डिव्हिलियर्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा सक्रीय होण्याचे संकेत दिले होते. मात्र एबीला संघात स्थान मिळालेले नाही. जर डिव्हिलियर्स मैदानात उतरला तर त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याला संघात घेण्याबाबत विचार नक्की केला जाईल.  

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दक्षिण अफ्रीकेचा टी-२० संघ:
क्विंटन डिकॉक (कप्तान), टेम्बा बाव्हुमा, फाफ डुप्लेसीस, रासी वान डर डुसेन, डेव्हिड मिलर, पिट वान बिल्जॉन, ड्वेन प्रिटोरियस, एंडिले फेहलुकवायो, जॉन-जॉन स्म्टस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, लुंगी एनगिडी, ब्योर्न फोर्टुइन, एनरिच नोर्टजे, डेल स्टेन, हेनरिक क्लासेन। 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: south africa vs australia t20 series faf du plessis kagiso rabada recalled AB DE villiers Not Part of south africa squad for t20s