पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA: सडपातळ सैनीच्या वेगवान गोलंदाजीनं आफ्रिकन कोच प्रभावित

नवदीप सैनी

India vs South Africa 2019: दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलून आणि सध्याच्या घडीला फलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघासोबत असलेल्या लान्स क्लूजनरला  भारताच्या नवोदित गोलंदाजाने आपल्या माऱ्याने प्रभावित केले आहे. लान्स क्लूजनरने विंडीज दौऱ्यावर टी-२० पदार्पणात लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या नवदीप सैनीचे कौतुक केले आहे. 

China Open 2019 : सायनाचा संघर्ष कायम,सिंधूची आगेकूच

नुकतेच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये लान्स क्लूजनर म्हणाला की, नवदीप सैनीच्या कामगिरीवर मी खूप खुश आहे. दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या युवा खेळाडूंना क्लूजनरने मार्गदर्शन केले होते. क्लूजनरच्या काळातच नवदीप सैनी प्रकाशझोतात आला होता. एखाद्या गोलंदाजाला १५० KPH वेगाने सातत्यपूर्ण चेंडू टाकताना मी फार कमी पाहिले आहेत. नवदीप सैनीमध्ये ती क्षमता आहे. तो नेहमी वेगाने चेंडू टाकण्यावर भर देतो.   

वयाच्या ४२ व्या वर्षी दिनेश मोंगियाने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती

सडपातल दिसणाऱ्या नवदीप सैनीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेत प्रभावि कामगिरी करुन दाखवली होती. नवदीप कसोटीमध्ये पदार्पणासाठी देखील उत्सुक आहे. सध्याच्या घडीला कसोटी संघात दर्जेदार गोलंदाज आहेत. त्यामुळे कसोटी पदार्पणासाठी प्रतिक्षा करावी लागेल, असेही सैनीने म्हटले होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:South Africa Tour To India 2019 Lance Klusener praises navdeep saini says Do not see many who bowl at 150 kmph