कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे चेंडू चमकवण्यासाठी थुंकी लावण्याच्या कृतीवर नियंत्रण येणार आहे. भारताचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वरने सामन्यापूर्वी याचे संकेत दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अनेक गोष्टींवर बंधने येणार असून चेंडू चमकवण्यासाठी थुंकीचा वापर करण्यावरही निर्बंध घातले जाऊ शकतात, असे भुवीने म्हटले आहे.
...म्हणून सचिनचा निर्णय विरुला खटकला!
धर्मशाळा येथील मैदानातून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. १२ मार्च रोजी होणाऱ्या या सामन्यापूर्वी खेळाडूंना अनेक सूचना देण्यात येत आहेत. यात चेंडू चमकवण्यावरही बंधने घालण्यात येऊ शकतात. सामन्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषधेमध्ये बोलताना भुवी म्हणाला की, चेंडू चमकवण्यासाठी थुंकीचा वापर करणार की नाही हे सध्या सांगणे कठीण आहे. कारण चेंडूची चमक राखण्यासाठी आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. अशा परिस्थितीत नेमके काय करावे? हा आमच्यासमोर मोठा प्रश्नच आहे. यावर बंधने आली तर आमच्या गोलंदाजीवर फलंदाज सहज धाव करतील, असेही त्याने म्हटले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावातही राज्य सरकारकडून IPL ला परवानगी, पण...
तो पुढे म्हणाला की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मैदानात कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या नाही यासंदर्भात बैठक होणार आहे. या बैठकीत जो ठराव होईल. डॉक्टरांकडून ज्या सूचना दिल्या जातील त्याचे आम्ही पालन करु, असेही भुवीने म्हटले आहे. दुखापतीमुळे भुवी संघाबाहेर होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून तो पुन्हा संघात पुनरागमन करत आहे. या मालिकेत तो कशी कागिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.