पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कसोटीतही हिटमॅनच भारताच्या डावाला सुरुवात करण्याचे संकेत

रोहित शर्मा

भारतीय संघाची फलंदाजी सक्षम असली तरी क्रमवारीबाबतचा कळीचा मुद्दा आतापर्यंत अनेकवेळा डोकेदुखी ठरला आहे. या पार्श्वभूमीवर नव नियुक्त फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड काय रणनिती आखणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. घरच्या मैदानात सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेने विक्रम राठोड आपल्या कार्यकाळाची सुरुवात करणार आहेत. राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भारतीय टी-२० संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. 

आफ्रिकेचा कर्णधार म्हणतो, कोहली-रबाडाची 'टशन' पुन्हा पाहायला मिळेल

विश्वचषकातील दमदार कामगिरीनंतरही भारतीय संघाने विंडीज कसोटी सामन्यासाठी रोहित शर्मावर भरवसा दाखवला नव्हता. मात्र दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याला संघात संधी देण्यात आली आहे.   रोहित शर्मा क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात डावाची सुरुवात करण्याची क्षमता असणारा फलंदाज आहे, असे विक्रम राठोड यांनी म्हटले आहे. रोहित शर्मा तिन्ही प्रकारात कायम स्वरुपी संघात असायलाच हवा, यावरही त्यांनी जोर दिला. 

मोहालीत ढगाळ वातावरण असेल, पण शक्यता धावांचा पाऊस पडण्याची

रोहित शर्मा हा एकदिवसीय आणि टी-२० मध्ये भारतीय संघाचा नियमित संघासोबत असला तरी कसोटी संघात त्याला आपले स्थान पक्के करता आलेले नाही. पांढऱ्या चेंडूवर डावाची सुरुवात करताना रोहितने आपल्यातील क्षमता सिद्ध केली आहे. कसोटीमध्ये तो अशी कामगिरी करु शकतो. त्याची कामगिरी संघासाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वासही विक्रम राठोड यांनी व्यक्त केला. पहिल्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन आताच सांगता येणार नाही, पण रोहित शर्मामध्ये कसोटी सामन्यातही डावाला सुरुवात करण्याची क्षमता आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:South Africa tour of India 2019 Rohit Sharma too good a player to not be playing all formats Vikram Rathour india vs south africa