पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDvsSA: फॅक्चर बुमराहने घेतली कसोटीतून माघार

जसप्रीत बुमराह

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने माघार घेतली आहे. पाठीला फॅक्चर असल्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे. 
बीसीसीआयने ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. बुमराहने दुखापतीमुळे मालिकेतून माघारी घेतली असून त्याच्या ऐवजी उमेश यादवला भारताच्या ताफ्यात सामील केल्याचा उल्लेख ट्विटमध्ये केला आहे.

तिच्या 'ग्रेट' भाषणावर रोहित म्हणाला, ग्रेटा तू आमची 'प्रेरणा' आहेस

बुमराहच्या पाठीला किरकोळ फॅक्चर असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये निरिक्षणाखाली असून वैद्यकीय टीमकडून त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देखील बीबीसीआयने आपल्या प्रसिद्धपत्रकातून दिली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेवेळी बुमराहला विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर २ ऑक्टोबरपासून विशाखापट्टणमच्या मैदानातून तो भारताच्या डावाची सुरुवात करेल, असे अपेक्षित होते.

मेस्सीचा विक्रमी षटकार, सोहळ्याला रोनाल्डोची दांडी

उमेश यादवची भारतीय संघात निवड करण्यात आली असली तरी त्याला टीम इलेव्हनमध्ये स्थान मिळणे मुश्किल आहे. भारतीय खेळपट्टीवर दोनपेक्षा अधिक जलदगती गोलंदाज खेळण्यास भारतीय संघ प्राधान्य देत नाही. बुमराहच्या अनुपस्थितीत ईशांत आणि शमी संघात आहेत. दरम्यान उमेश यादवचा संघात स्थान मिळाले असले तरी तो स्थानिक क्रिकेट खेळणार आहे, असे निवड समितीचे अध्यक्ष एमके प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:South Africa tour of India 2019 India vs South Africa Jasprit Bumrah ruled out Umesh Yadav named as replacement in Indias Test squad