पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आफ्रिकेची 'स्टेनगन' आता कसोटीत धडाडणार नाही

डेल स्टेन

दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत स्टेनने ४३९ बळी टिपले आहेत. ९३ कसोटीत त्याची २२.९५ अशी सरासरी आहे.

स्टेनने २००४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून कसोटी  पदार्पण केले होते. फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने अखेरचा सामना खेळला आहे. कसोटीमधून निवृत्ती घेतली असली तरी वनडे आणि टी-२० मध्ये स्टेनचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

विराट भारी की स्मिथ? सोशल मीडियावर रंगली चर्चा

काही दिवसांपासून स्टेनला दुखापतीने त्रस्त केले आहे. दुखापतीमुळे त्याला विश्वचषक स्पर्धेलाही मुकावे लागले होते. विश्वचषकात तो केवळ दोन सामन्यात मैदानात उतरला होता. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळता तो दुखापतग्रस्त झाला होता. आयपीएलनंतर विश्वचषकात संघात स्थान मिळाले. पण दोन सामन्यानंतर त्याने माघार घेतली होती.