पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आफ्रिकेचा संघ कोलकाताहून व्हाया दुबई मायदेशी परतणार

दक्षिण आफ्रिका संघ कोलकात्यामध्ये दाखल झाला (photo Samir Jana)

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्याची मालिका रद्द करण्यात आली आहे. भारत दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालिका रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे एकही सामना न खेळता दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मायदेशी परतावा लागणार आहे. 

दक्षिण आफ्रिका संघ कोलकाता येथे दाखल [Photo Samir Jana]

दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकाताहून मायदेशी परतणार आहे. सोमवारी संघातील सर्व खेळाडू कोलकातामध्ये दाखल झाले.  कोलकाता आंतरराष्ट्रीय विमानतळावर बाहेर पडताना संघातील खेळाडूंनी मास्क बांधून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला आहे याठिकाणी कर्णधार क्विंटन डिकॉक आणि फाफ ड्युप्लेसी यांच्यासह अन्य खेळाडूंची कोरोना विषाणू संदर्भातील प्राथमिक तपासणी करण्यात आली.

 कोलकाताहूनच संघ मायदेशी परतणार आहे.[Photo Samir Jana])

बंगाल क्रिकेट संघाचे अध्यक्ष अविषेक दालमिया यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेचा संघ मंगळवारी कोलकाता विमानतळावरुन दुबई मार्गे मायदेशी परतणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माहिती देण्यात आल्याचेही दालमिया यांनी सांगितले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात धर्मशाला, लखनऊ आणि कोलकाता याठिकाणी तीन सामन्यांची मालिका नियोजित होती.

क्विंटन डिकॉक [Photo Samir Jana]

१२ मार्चला धर्मशाला येथील सामन्यात पावसाने व्यत्यय आणळा होता. त्यानंतर कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उर्वरित दोन्ही सामने रद्द करण्यात आले. १८ मार्चला दोन्ही संघातील शेवटचा सामना कोलकाताच्या मैदानात खेळवण्यात येणार होता. मात्र मालिका रद्द झाल्यामुळे कोलकाताहून दक्षिण आफ्रिका संघ १८ मार्चपूर्वी मायदेशी परतणार आहे.