पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हो मी भारतीय संघाचा प्रशिक्षक होईन पण...'

सौरव गांगुली

भारतीय संघ बांधणीचा शिल्पकार माजी कर्णधार सौरव गांगुली रोखठोक मत मांडण्यासाठी ओळखला जातो. नुकतेच त्याने आगामी काळात भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरण्याचे संकेत दिले. कोलकाता येथील टाटा स्टीलच्या कार्यक्रमात  गांगुली सहभागी झाला होता. यावेळी त्याला भविष्यात भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी काम करण्यास  इच्छूक आहेस का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. सध्या आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सला मार्गदर्शन करणाऱ्या गांगुलीने यावर परखड मत मांडले. सध्याच्या प्रशिक्षकांना आपला कार्यकाळ पूर्ण होऊ द्यायला हवा. त्यानंतर आपण दुसऱ्या प्रशिक्षकाबद्दल विचार करु, असे उत्तर गांगुलीने दिले. 

गेलच्या महाबली विक्रमापर्यंत पोहचणे 'मुश्किलच'

गांगुली म्हणाला की, सध्याच्या घडीला मी दिल्ली कॅपिटलचा  प्रशिक्षकच आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली संघाने चांगली कामगिरी केली. मागील सात वर्षांत संघाने पहिल्यांदा सेमीफायनलपर्यंत धडक मारली ही जमेची बाजू आहे, असेही गांगुलीने सांगितले. यावेळी त्याला भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीविषयी देखील प्रश्न विचारण्यात आला होता. यावरह हा निर्णय खुद्द धोनी आणि भारताचा सध्याचा कर्णधार विराट कोहली या दोघांवर सोडायला हवा, असे गांगुलीने म्हटले आहे. 

PKL : नवीन कुमारची 'दबंग' कामगिरी! दिल्लीचा आणखी एक विजय

भारताच्या प्रशिक्षक पदासंदर्भात तो पुढे म्हणाला की, सध्याच्या घडीला मी अनेक जबाबदाऱ्या सांभाळत आहे. आयपीएल, बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB), टीव्हीवरील समालोचन या सर्व जबाबदाऱ्या मला सुरळीत पार पाडू देत. योग्यवेळी प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत नक्की उतरेन, असे सांगत गांगुलीने भविष्यात भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याचे संकेत दिले.