पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुमराहसाठी दादानं प्रोटोकॉल ठेवला बाजूला

जसप्रीत बुमराह

भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह दुखापतीच्या कारणास्तव मागील काही दिवसांपासून संघाबाहेर होता. आगामी वर्षात मायदेशात होणाऱ्या श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतून तो भारतीय संघात पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याची संघात वर्णी लागली आहे. आंतरराष्ट्रीय मैदानात उतरण्यापूर्वी जसप्रीत बुमराह रणजीच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा होती. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यापूर्वी त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणे अपेक्षितच होते. पण गांगुलीमुळे बुमराह थेट आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठीच मैदानात उतरणार आहे. 

भारत असुरक्षित म्हणणाऱ्या PCB अध्यक्षाला BCCI च्या अधिकाऱ्याने फटकारले

केरळ आणि गुजरात यांच्या उद्यापासून (गुरुवारी) एलिट ग्रुप ए गटतील सामना रंगणार आहे. तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतलेल्या बुमराहला केरळविरुद्धच्या एलिट ग्रुप ए सामन्यासाठी गुजरातकडून खेळणे अपेक्षित होते. मात्र बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेवून बुमराहला विश्रांती कायम ठेवत रणजीत न खेळण्याची परवानगी दिली आहे. भारतीय संघाचे आगामी वर्षातील वेळापत्रक लक्षात घेऊन  गांगुली, भारतीय संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहली एकमताने बुमराहसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे बुमराह आता थेट श्रीलंकेविरूद्धच्या टी -२० मालिकेतच मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे.

बेन स्टोक्सच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, इंग्लंडचे टेन्शन वाढले

जसप्रीत बुमराह रणजीत खेळण्यास सज्ज झाल्यानंतर राष्ट्रीय निवड समितीने गुजरात संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून दिवसाला किमान ८ षटके गोलंदाजीची परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. राष्ट्रीय निवड समितीच्या या विनंतीवर गुजरात संघ व्यवस्थापन फारसे समाधानी नव्हते. एका दिवसात जास्तीत जास्त आठ षटके गोलंदाजी करणार्‍या खेळाडूला टीम इलेव्हनमध्ये स्थान देण्याबाबत त्यांनी म्हणावी तशी तयारी दिसत नव्हती. मात्र गांगुली यांच्या निर्णयामुळे हा प्रश्नच निकाली लागला आहे.