पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकच्या PM बद्दल गांगुली म्हणतो, हा क्रिकेटमधला इम्रान नव्हे

सौरव गांगुली आणि इम्रान खान

संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेल्या भाषणावर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रतिक्रिया दिली आहे. इम्रान यांचे भाषण फुकाची बडबड होती, अशा शब्दांत गांगुलीने इम्रान खान यांचा समाचार घेतलाय.  ज्या इम्रान खान यांना क्रिकेट जगतात ओळखले जाते ते हे नाहीत, असेही गांगुलीने म्हटले आहे. भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने इम्रान खान यांच्यांसदर्भातील एक व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे.

बर्थडे बॉय पंतच्या संघर्षाची 'अनडोल्ड' कहाणी

यावर गांगुलीने प्रतिक्रिया देताना लिहलंय की, वीरु हा व्हिडीओ पाहून मी हैराण झालो. जगाला सध्या शांतता हवी आहे. परंतु हा नेता जो बोलला ते भयावह आहे. क्रिकेटच्या मैदानातून घराघरात पोहचलेला हा इम्रान नाही, असा उल्लेखही गांगुलीने केला आहे. संयुक्त राष्ट्र महासभेतील भाषणाशिवाय इम्रान खान यांनी अमेरिकेतील एका टेलिव्हिजनसाठी मुलाखत दिली होती. यात चीनचे कौतुक करत इम्रान यांनी अमेरिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

'महिलांकडे पाहण्याची ही मानसिकता बरी नव्हे'

याशिवाय अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकी तुकडीचा मुद्दा उपस्थित केला. चीनमध्ये अमेरिकेपेक्षा अधिक प्रगत असल्याचा उल्लेखही इम्रान यांनी आपल्या मुलाखतीमध्ये केला. दरम्यान न्यूज अँकरने त्यांना तुम्ही एखाद्या राष्ट्राच्या पंतप्रधानांपेक्षा वेल्डरसारखे बोलत आहात, अशी फिरकी देखील घेतली होती.