पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड निश्चित

सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांची एकमताने निवड निश्चित झाली आहे. त्याचवेळी मंडळाच्या सचिवपदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा यांची निवड निश्चित झाली आहे. मंडळाच्या खजिनदारपदी अरूण धुमाळ यांची निवड निश्चित झाली आहे. धुमाळ हे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू आहेत.

नियंत्रण रेषेवरील सैन्यदलांच्या संख्येत लष्कराकडून मोठी वाढ

या पदांसाठी अर्ज दाखल करण्याचा सोमवारचा अखेरचा दिवस आहे. पण गेल्या काही दिवसांपासून पडद्याआड सुरु असलेल्या चर्चेअंती या तिन्ही नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे या तिघांची निवड ही केवळ औपचारिकता राहिली आहे. त्याचवेळी निवडणुकीशिवाय एकमताने या पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सिलेंडर स्फोटानंतर इमारत कोसळली; १० जणांचा मृत्यू

सौरव गांगुली हे सध्या पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये सौरव गांगुली यांनी भारतीय संघाला यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने देशात आणि परदेशात चांगली कामगिरी बजावली होती. आता बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून सौरव गांगुली यांच्या नव्या कारकीर्दीला सुरुवात होते आहे.