पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दादा'सोबत सेल्फी काढण्यासाठी विमानतळावर चाहत्यांची गर्दी

बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली

सोशल मीडियावर सध्या बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांचीच चर्चा पाहायला मिळत आहे. सौरव यांनी विमानतळावरील स्वत:चा फोटो शेअर केला आहे. बंगळुरू विमानतळावर त्यांना पाहताच चाहत्यांची मोठी गर्दी त्यांच्याभोवती जमली. 

IND vs BAN : हवेचा दर्जा खालावला, तरीही पहिला सामना दिल्लीतच होणार !

क्रिकेटमधून निवृत्त झालेले सौरव यांचा मोठा चाहतावर्ग आहे. बंगळुरू विमानतळावर पाऊल ठेवताच क्रिकेटप्रेमींकडून करण्यात आलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे सौरवही भारवून गेले. त्यांनी चाहत्यांसोबत सेल्फी काढून याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्यांचे आभार मानले आहेत.

नुकतीच बीसीसीआयचे ३९ वे अध्यक्ष म्हणून गांगुली यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते बंगळुरू येथे आहेत. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांना भेटण्यासाठी ते आले आहेत. बीसीसीआय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा कायापालट करण्याच्या तयारीत आहे, या पार्श्वभूमीवर ही भेट असल्याचं म्हटलं जात आहे. 

शाकिबसाठी काय पण! बांगलादेशमध्ये क्रिकेट चाहते उतरले रस्त्यावर