पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रशिक्षक निवडीसंदर्भात मत मांडण्याचा विराटला अधिकार : गांगुली

सौरव गांगुली आणि विराट कोहली

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची नियुक्ती करताना कर्णधार विराट कोहलीची पसंती महत्त्वाची असल्याचे माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे. संघाचा प्रशिक्षक कोण हवे, हे मत मांडण्याचा विराटला अधिकार असल्याचा उल्लेख गांगुलीने केला. बांगला फूटबॉल लीगच्या पुरस्कार वितरणसोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या गांगुलीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्याने प्रशिक्षक निवडीत कर्णधाराची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. गांगुली म्हणाला की, भारतीय संघाचे नेतृत्व हे विराट कोहलीकडे आहे. त्यामुळे प्रशिक्षकपदी कोणाची निवड करावी, याबाबत विचार मांडण्याचे त्याला अधिकार आहे.  

 

..म्हणून विराट विश्रांती विना विंडीज दौऱ्यासाठी सज्ज

विंडीज दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये विराट कोहलीने रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले होते. रवी शास्त्री प्रशिक्षक पदी कायम राहिले तर संघासाठी आनंदाची बाब असेल, असे विराटने म्हटले होते. विराट म्हणाला होता की, क्रिकेट सल्लागार समितीकडून प्रशिक्षक पदाबाबत माझ्याशी कोणताही संवाद केलेला नाही. त्यांनी मला विचारले तर रवी शास्त्री यांच्यासोबत संघाचा ताळमेळ चांगला आहे, असे मी सांगेन, असे विराट म्हणाला होता.  

 

रोहितसोबत कोणतेही मतभेद नाहीत : विराट कोहली

पुढील महिन्यात बीसीसीआयद्वारे नेमलेली क्रिकेट सल्लागार समिती भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षक पदाची निवड करणार आहे. या समितीमध्ये भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज अष्टपैलू कपिल देव, माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड आणि भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार शांथा रंगास्वामी यांचा समावेश आहे.