दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून विशाखापट्टणमच्या मैदानातून सुरु होणार आहे. विडीज आणि आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यातील खराब कामगिरीनंतर पंतच्या परिपक्वतेबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत त्याला संधी द्यावी की नाही, अशी चर्चा रंगण्यास आता सुरुवात झाली आहे. दरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने पंतची पाठराखण करत तो क्रिकेटच्या सर्व प्रकारातील उत्तम खेळाडू असल्याचे म्हटले आहे.
रोहितचा सराव 'शून्य' खेळ, लक्ष्मण यांचा 'व्हेरीव्हेरी स्पेशल' सल्ला
विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापासून विडींज दौरा आणि आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत ऋषभ पंत अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. चांगल्या चेंडूवर नव्हे तर त्याने खराब शॉट सिलेक्शनमुळे आपली विकेट टाकल्याचे पाहायला मिळाले. पंत संध्या संघर्ष करत असला तरी तो आपली चूक सुधारेल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला आहे.
सौरव गांगुलीने 'टाइम्स ऑफ इंडिया' साठी लिहिलेल्या लेखातून पंतचे समर्थन केले आहे. त्याने लिहिलंय की 'ऋषभ पंतच्या शॉट सिलेक्शनबद्दल उपस्थित करण्यात येणारे प्रश्न योग्य आहेत. पण हळूहळू तो यातील चुका दूर करेल. आपण त्याला अधिकाधिक संधी द्यायला हवी, असेच गांगुलीला वाटते.
धोनीला मर्जीनुसार खेळता येणार नाही : गंभीर
आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत पंतने अनुक्रमे ४ आणि १९ धावा करुन तंबूत परतला होता. दोन्ही वेळी त्याने चुकीच्या शॉट सिलेक्शनमुळे आपली विकेट गमावली होती. कोहली युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्यामुळे आपण कर्णधार आणि प्रशिक्षक या दोघांना प्रोत्साहन द्यायला हवे, असा उल्लेखही गांगुलीने आपल्या लेखात केला आहे. ऋषभ पंत तिन्ही प्रकारातील उत्तम खेळाडू असून सामना जिंकून देण्याची त्याच्यात क्षमता आहे, असेही गांगुलीने म्हटले आहे.