पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BCCI अध्यक्षस्थानी विराजमान होताच धोनीबाबत गांगुली म्हणाले...

सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनी

भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली बुधवारी भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमाने झाले. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर मुंबईतील पत्रकार परिषदेत गांगुली यांच्यावर काही प्रश्नाचा मारा झाल्याचे पाहायला मिलाले. यात महेंद्रसिंह धोनीची निवृत्ती आणि संघाच्या आगामी धोरणांसदर्भातील प्रश्नांचा समावेश होता.  

BCCIचे अध्यक्ष गांगुली यांच्या कुलिंग पीरियडचा फंडा नक्की आहे तरी

धोनीच्या निवृत्तीबाबत गांगुली म्हणाले की, चॅम्पियन कधीच संपत नसतो. धोनी भारतीय क्रिकेटमधील एक महान खेळाडू आहे. जोपर्यंत मी अध्यक्षस्थानी आहे. तोपर्यंत सर्व खेळाडूंना सन्मान मिळेल. उल्लेखनिय आहे की, विश्वचषकानंतर महेंद्रसिंह धोनी क्रिकेटच्या मैदानात दिसलेला नाही. रांची येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीमध्ये धोनी ड्रेसिंगरुममध्ये दिसला होता.  

सौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

गांगुली म्हणाले की, अद्याप कर्णधार विराट कोहलीसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. लवकरच त्याची भेट घेणार आहे. सध्याच्या घडीला विराट कोहली भारतीय क्रिकेटमधील महत्त्वाचा चेहरा असल्याचा उल्लेखही गांगुली यांनी यावेळी केला. सौरव गांगुली पुढील नऊ महिने भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षपदाचा कारभार पाहणार आहेत. या अल्पकाळात गांगुली यांच्याकडून मोठ्या बदलाची अपेक्षा केली जात आहे.