पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सौरव गांगुली यांनी BCCI च्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

सौरव गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला

३३ महिन्यांच्या कालावधीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) आपला अध्यक्ष मिळाला आहे. माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी बुधवारी मुंबईत औपचारिकपणे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. सौरव गांगुली हे मंडळाचे ३९ वे अध्यक्ष झाले आहेत. अध्यक्षपदासाठी यावेळी फक्त सौरव गांगुली यांचाच अर्ज आल्याने त्यांची निवड केवळ औपचारिकता होती. ती गेल्या आठवड्यातच पार पडली. 

विधानसभा निवडणूक : मतमोजणीबद्दलची सर्व माहिती एका क्लीकवर

सौरव गांगुली यांच्यासोबतच बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांनीही बुधवारी पदभार स्वीकारला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांनी सचिव म्हणून कार्यभार स्वीकारला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू अरूण सिंग धुमाळ यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला. माहिम वर्मा यांनी उपाध्यक्ष म्हणून तर जयेश जॉर्ज यांनी सहसचिव म्हणून कार्यभार स्वीकारला. 

राज्यातील या प्रतिष्ठित लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष

गेल्या तीन वर्षांपासून बीसीसीआयचा कारभार सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीकडून बघितला जात होता. कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडून सौरव गांगुली यांनी पदभार स्वीकारला आहे. सौरव गांगुली यांना १० महिन्यांचाच कालावधी मिळणार आहे. त्यामध्येच त्यांना आपले निर्णय घ्यावे लागणार आहेत. सौरव गांगुली हे गेल्या पाच वर्षांपासून बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.