कोरोना विषाणूने जगभरात घातलेल्या थैमानामुळे खेळाची मैदाने ओस पडली आहेत. आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. दरम्यान पुढच्या महिन्यात (मे) जर्मनीमधील प्रीमियर फुटबॉल लीग 'बुंडेसलीगा' प्रेक्षकाविना खेळवण्याबाबत विचार सुरु आहे. या स्पर्धेप्रमाणे आयपीएलसंदर्भात तुर्तास कोणताही विचार सुरु नाही, असे बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.
Video :लॉकडाउनमध्ये तरुणींची भन्नाट कल्पना, टेरिसवर असा रंगला खेळ
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गांगुली म्हणाले की, जर्मनी आणि भारत या ठिकाणावरील सोशल डिस्टन्सिंग नियमाची वास्तव्य अगदी वेगळे आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला भारतामध्ये क्रिकेटची स्पर्धा घेणे मुश्किल आहे. सध्याची परिस्थिती ही बिकट असून लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न समोर दिसत असताना तुम्ही खेळाबाबत कोणताही विचार करु शकत नाही, असेही गांगुली यांनी म्हटले आहे.
कोविड -१९: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंका दौरा स्थगित
गांगुली यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या फिरकीपटू हरभजन सिंगनेही गांगुलीच्या सूरात सूर मिसळत क्रिकेटसाठी सध्याचे वातावरण पोशख नसल्याचे म्हटले आहे. भज्जी म्हणाला की, आयपीएलचे आघाडीचे खेळाडू मैदानातच लोकांना एकत्रित करत नाहीत तर त्यांना पाहण्यासाठी हॉटेल आणि ते ज्या मार्गावरुन प्रवास करतील त्याठिकाणी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे प्रेक्षकांशिवाय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली तरी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अवघड असेल, असे मत हरभजनने व्यक्त केले आहे. यापूर्वी त्यानेच नव्हे तर गांगुली यांनीही प्रेक्षकांशिवाय सामने खेळवण्याबाबत विचार केला जाईल, असे म्हटले होते.