पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजिंक्य, शुभमन वनडे संघात का नाहीत? गांगुलीचा निवड समितीला सवाल

गांगुली आणि कोहली

India Tour of West Indies 2019: विंडीज दौऱ्यासाठी नुकतीच भारतीय संघाची निवड करण्यात आली. निवड समितीने विंडीज दौऱ्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असली तरी काहींच्या कामगिरीकडे निवड समितीने दुर्लक्ष केल्याचेही चित्र आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने देखील संघ निवडीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याशिवाय त्याने रणनितीमधील सातत्य कायम ठेवण्याचा सल्लाही दिलाय. 

युवीनं लाराला सांगितला गांगुलीच्या 'दादागिरी'चा किस्सा

अनुभवी अजिंक्य रहाणे आणि शुभमन गिल यांची एकदिसीय सामन्यांसाठी निवड का केली नाही? असा प्रश्न गांगुलीने उपस्थित केला आहे. ३ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या विडींज दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ३ एकदिवसीय आणि २ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी निवडलेल्या संघ निवडीवर गांगुलीने नाराजी व्यक्त केली.  
गांगुलीने ट्विटरच्या माध्यमातून निवड समितीला खडेबोलही सुनावले आहेत. सर्वोत्तम संघाची निवड करणे हे निवड समितीचे काम आहे. एखाद्याला खूश करणे नव्हे, असा उल्लेखही गांगुलीने ट्विटमध्ये केला आहे. 

...म्हणून संघ व्यवस्थापनानेच धोनीला निवृत्तीपासून रोखलय

गांगुलीने ट्विटमध्ये लिहलंय की, समतोल आणि आत्मविश्वास कायम ठेवण्याचा विचार करण्याची गरज आहे. निवड समितीने सर्व प्रकारातील सामन्यासाठी समान खेळाडूंची निवड करायला हवी. मोजके खेळाडू सर्व प्रकारात खेळतात. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा भरणा असेल तरच संघ यशस्वी ठरतो. सर्वांना खूश ठेवण्याची गरज नाही. योग्य खेळाडूची निवडीसह सर्वोत्कृष्ट संघ निवडावा' असे गांगुलीने निवड समितीला सुनावले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: sourav ganguly not happy with team selection for west indies tour surprised by omission of ajinkya rahane and shubman gill player from indian squad