मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलाच्या अग्नीतांडवातील पीडितांच्या मदतीसाठी आयोजित केलेल्या बुशफायर चॅरिटी क्रिकेटसाठी तो याठिकाणी गेला आहे. या सामन्यातील सहभागानंतर सचिनने मेलबर्नमध्ये भ्रमंती केल्याचे पाहायला मिळाले. सचिनने आपल्या इन्टाग्राम अकाउंटवरुन यासंदर्भातील एक फोटो शेअर केला आहे. 'सोकिंग अप द सन' असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
मालकाला आला पंतचा पुळका, बाकावर बसवायला संघात घेतलय का?
ऊनाचा आनंद घेत असतानाचा सचिनने शेअर केलेला फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी क्रिकेटर सौरव गांगुली यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. नशिबवान आहेस, सुट्टीचा आनंद घे! अशा आशयाची मजेशीर प्रतिक्रिया देत गांगुली यांनी मास्टर ब्लास्टरची फिरकी घेतली आहे.
Video : ऑस्ट्रेलियन महिलांच्या गोलंदाजीवर सचिनची फटकेबाजी
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर ९ फेब्रुवारीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जवळपास साडे पाच वर्षांनी बॅट हातात घेतल्याचे पाहायला मिळाले होते. ऑस्ट्रेलियातील चॅरिटी सामन्यादरम्यानच्या ब्रेकमध्ये त्याने ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सच्या गोलंदाजींवर फलंदाजी करताना पाहायला मिळाले होते. ऑस्ट्रेलियन महिला संघातील जलदगती गोलंदाज एलिस पेयरीने सचिनला आव्हान दिले होते. तिचे हे आव्हान स्वीकारत सचिनने तिच्या गोलंदाजीव फटकेबाजी केली. पेरीचा सामना करताना तिच्यापेक्षा मी अधिक नर्वस होतो, अशी प्रतिक्रियाही सचिनने दिली होती. विशेष म्हणजे यासाठी त्याने नेटमध्ये सरावही केला होता.