पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर IPL सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश नसेल!

आयपीएल स्पर्धेतील सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जाण्याची शक्यता

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थितीत करण्यात येत आहेत. आयपीएलची लोकप्रियता पाहता सद्यपरिस्थितीत स्पर्धा भरवणे योग्य नाही, असा सूर उमटत आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल स्पर्धे नियोजित वेळेत होणार हे स्पष्ट केल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. सौरव गांगुली मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. स्पर्धा नियोजित वेळेतच होईल, असे त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. 

MCG वरील विक्रमी गर्दी ही महिला क्रिकेटसाठी 'अच्छे दिन'चे संकेत

आयपीएल स्पर्धेच्या नियोजित तारखामध्ये बदल होऊ शकतो किंवा स्पर्धा रद्द होण्याचीही शक्यता निर्माण झाली असताना स्पर्धा प्रेक्षकांशिवाय खेळवण्याबाबतही विचार सुरु असल्याची चर्चा आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांना एन्ट्री न देता सामन्याशी संबंधित अधिकारी व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत सामने खेळवले जाऊ शकतात. लाईव्ह प्रेक्षपणामुळे क्रिकेट चाहत्यांना घरी बसून सामन्याचा आनंद घेता येईल, असा मार्ग देखील बीसीसीआय काढू शकते. आयपीएल स्पर्धा २९ मार्चपासून नियोजित आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना केंद्र तसेच राज्य सरकारकडून करण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा प्रभाव आणखी पसरण्याची भिती आहे. लोकप्रिय असलेल्या आयपीएल स्पर्धेत प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी होत असते. त्यामुळेच आयपीएल स्पर्धा पुढे ढकलावी किंवा रद्द करावी, या चर्चेला सुरुवात झाली आहे. 

कोरोना: दादा ठाम असताना राज्याचे मंत्री म्हणाले, आता IPL स्पर्धा नकोच!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन सामने नियोजित वेळेत खेळवू, असे गांगुली यांनी सांगितले होते. सामना रद्द करण्याची मागणी ही मोठा जमाव एकत्र येण्यापासून रोखणे हाच आहे. त्यामुळे प्रेक्षकांशिवाय सामने खेळवण्याचा नवा फंडा बीसीसीआय यावेळी वापरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  काउंटी क्रिकेटच्या निमित्ताने अनेक देशांचा खेळाडून विविध ठिकाणचे दौरे करत आहेत. कोरोनाची कोणतीही समस्या समोर आलेली नाही, असा दाखला देत गांगुली यांनी स्पर्धा नियोजित वेळेत होतील, असे म्हटले होते. स्पर्धेसंदर्भात अद्यापही संभ्रम असून बीसीसीआय नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sourav Ganguly confirms no IPL postponement coronavirus threat on ipl 2020 Stakeholders want closed door matches in this tournament