पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अभिनंदन दादा.... देर है अंधेर नहीं! सेहवागचा शुभेच्छा स्ट्रोक

विरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची औपचारिकता बाकी आहे. मात्र अधिकृतरित्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड होण्यापूर्वीच सौरव गांगुलीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दादावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. यात दिग्गज क्रिकेटर्संचाही समावेश आहे. 

बीसीसीआयच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांची निवड निश्चित

माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण याच्यासह भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागने खास अंदाजात सौरव गांगुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. विरेंद्र सेहवागने ट्विटमध्ये लिहलंय की, 'अभिनंदन दादा! देर है अंधेर नहीं।  भारतीय क्रिकेटसाठी हा शुभ संकेत आहे, असा उल्लेखही त्याने केला आहे.  

मी कसा काय विरोध करू शकतो? - शरद पवार

मोहम्मद कैफने देखील ट्विटच्या माध्यमातून सौरव गांगुलीला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहलंय की, 'खेळाडू ते कर्णधार आणि कर्णधारपदानंतर आता बीसीसीआय अध्यक्ष झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा! बीसीसीआयला गांगुलीसारखे नेतृत्व मिळणे चांगले संकेत आहेत. २३ आक्टोबरला बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. याचवेळी गांगुलीच्या नावाची अधिकृत घोषणा देखील केली जाईल.