पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आतापर्यंत गड्यालाही जमलं नाही ते या महिला क्रिकेटरनं करुन दाखवलं

सोफी डेव्हिन

न्यूझीलंड महिला टी-२० क्रिकेटसंघाची कर्णधार सोफी  डेव्हिन हिने टी-२० क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलाय. सोमवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात तिने झटपट क्रिकेटमधील पहिलं वहिलं शतक साजरे केले. या कामगिरीसह तिने टी-२० मध्ये सातत्यपूर्ण पाचव्यांदा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम करुन दाखवला. महिला तसेच पुरुष टी-२० क्रिकेटमध्ये यापूर्वी अशी सातत्यपूर्ण कामगिरी अन्य कोणत्याही खेळाडूला जमलेली नाही. 

नाबाद शतकी खेळीसह अजिंक्य कसोटीसाठी सज्ज

न्यूझीलंडमधील वेलिंग्टनच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात तिने ६५ चेंडूत केलेल्या नाबाद १०५ धावांच्या जोरावर यजमान महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला ६९ धावांनी पराभूत केले.  फेब्रुवारीमध्ये भारतीय महिलासंघोविरुद्ध ३० वर्षीय सोफीनं ७२ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत तिने ५४, ६१ आणि ७७ अशा धावा केल्या. चौथ्या सामन्यात शतकी खेळी करुन तिने टी-२० मध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला. 

Video U-19 WC : फायनलमध्ये 'जंटलमन गेम' बदनाम!

भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज, न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ब्रँडम मॅकलम, ख्रिस गेल यांनी यापूर्वी टी-२० मध्ये सलग चारवेळा ५० पेक्षा अधिक धावा सातत्यपूर्ण करण्याचा पराक्रम केला होता. या चौघांना मागे टाकत सोफीने नवा विश्वविक्रम आपल्या नावे केलाय. या विजयासह न्यूझीलंड महिलांनी ५ सामन्यांची मालिका ३-१ अशी खिशात घातली आहे. टी-२० मध्ये तीन अंकी धावसंख्या उभारणारी न्यूझीलंडची ती दुसरी महिला क्रिकेटर आहे.  यापूर्वी सुझी बेट्सने न्यूझीलंड महिला संघाकडून पहिले शतक झळकावले होते. २० जून २०१८ मध्ये तिने दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध ६६ चेंडूत नाबाद १२४ धावांची खेळी साकारली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sophie Devine went past Mithali Raj Brendon McCullum and Chris Gayle for the most number of consecutive 50 plus scores in T20Is Record