पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीम इंडियातील या खेळाडूला सोनाक्षी सिन्हाने म्हटले 'चुलबुल पांडे'

टीम इंडियातील या खेळाडूला सोनाक्षी सिन्हाने म्हटले 'चुलबुल पांडे'

बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हाचा दबंग-३ लवकरच रिलिज होणार आहे. तत्पूर्वी दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटचा दबंग, चुलबुल पांडे असून तो गोलंदाजांचा कर्दनकाळ असल्याचे तिने म्हटले आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यान १५ डिसेंबरपासून सुरु होत असलेल्या तीन एकदिवसीय मालिकेपूर्वी सोनाक्षीने विराटबाबत हे वक्तव्य केले आहे. भारत-विंडीज मालिकेपूर्वी हे दोन्ही कलाकार पहिल्या वनडेमध्ये टीव्हीवर लाइव्ह दिसतील.

जसप्रीत बुमराहची होणार फिटनेस टेस्ट, समोर 'विराट' आवाहन

सोनाक्षीने एका प्रमोशनल व्हिडिओत म्हटले की, मी ऐकलंय की विराट क्रिकेटच्या मैदानातील एक दबंग खेळाडू आहे. तो चुलबुल पांडे आहे आणि गोलंदाजांसाठी खतरनाक आहे. या मालिकेत निश्चितपणे मजा येईल आणि आम्ही स्टार स्पोर्ट्स स्टुडिओमधून टीम इंडियाला चिअर करु. 

Video : कोणाचा हे महत्त्वाचं नाही, पण हा झेल एकदा बघाच!

दबंगमध्ये सलमान खानने चुलबुल पांडेची भूमिका वठवली होती. सलमाननेही या प्रमोशनल व्हिडिओवर म्हटले की, संडेला आमच्याबरोबर या वनडेत सहभागी व्हा आणि फनडे साजरा करा. कारण हाच आमचा फंडा आहे. आम्ही या सामन्यात दबंग विराट कोहलीकडून आणखी एक जबरदस्त डावाची अपेक्षा करु.

सचिन विराट नव्हे दीपिकाला आवडतो हा क्रिकेटर

या मालिकेतील तिसऱ्या वनडेवेळी २२ डिसेंबर रोजी अक्षय कुमार आणि दिलजीत दोसांज हेही नेरोलॅक क्रिकेट लाइव्हमध्ये दिसण्याची शक्यता आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sonakshi Sinha reveals the name of indian player who is chulbul pandey and Dabangg of cricket