पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

त्याचा काही नेम नाही, गंभीरचा आफ्रिदीला टोला

गंभीरचा आफ्रिदीला टोला

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. क्रिकेटच्या मैदानातून दोघांमध्ये सुरु झालेली 'टशन' सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनुभावायला मिळते.   
आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रामध्ये गंभीरच्या खेळाडूवृत्तीवर आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याला डिवचल्याचा प्रकारही पाहायला मिळाला होता.

हरियाणा विधानसभा : बबीता फोगाट अन् योगेश्वर दत्त यांना तिकीट 

याला गंभीरने चोख प्रत्त्युत्तरही दिले. त्यानंतर आता गंभीरने एका मुलाखतीमध्ये आफ्रिदीसोबतच्या कडव्या संबंधावर भाष्य केले आहे. आफ्रिदीसोबत असलेल्या कडव्या असल्याने मला फार फरक पडत नाही. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की, आफ्रिदी सध्या खेळत नाही. पण तो कधीही खेळायला मैदानात उतरु शकतो. तो कधीच निवृत्त होणार नाही, असा बोचरा चिमटा गंभीरने काढला. मी माझ्या जागी योग्य होतो आणि आहे, असेही त्याने यावेळी स्पष्ट केले.   

IND vs SA 1st Test : अशी असेल विराटची टीम इलेव्हन

उल्लेखनिय आहे की गौतम गंभीरने २०१८ मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली होती. गंभीरने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कसोटीत ४ हजार १५४, एकदिवसीय सामन्यात ५ हजार २३८ आणि टी-२० मध्ये ९२३ धावा केल्या आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Some fights get personal Gautam Gambhir on equations with former Pakistan cricketer Shahid Afridi