पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृतीची आयसीसीच्या ODI अन् T-20 संघात वर्णी

स्मृती मानधना

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधनाला महिला आयसीसीसी संघाच्या एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये स्थान मिळाले आहे. मंगळवार आयसीसी क्रिकेट मंडळाने यासंदर्भातील घोषणा केली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृतीशिवाय झुलन गोस्वामी, पुनम यादव आणि शिखा पांडे या महिला खेळाडूंचा समावेश आहे. तर टी-२० मध्ये दीप्ति शर्माला स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंग हिच्याकडे एकदिवसीय आणि टी-२० संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. 

बाबर बघतोय विराटची बरोबरी करण्याची स्वप्नं

२३ वर्षीय स्मतीने ५१ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने तसेच ६६ टी-२० सामन्यासह २ कसोटी सामन्यात भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये तिने ३ हजार ४७६ धावा केल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला यंदाच्या वर्षीच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध विक्रमी १४८ धावांची खेळी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हीली हिचा टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटर तर ऑस्टेलियाच्या एलिसे पेरीला एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय तिला तिन्ही प्रकारात सर्वोत्तम कामगिरीबद्दल  रशेल हेहोई-फ्लिंट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

IPL 2020 Auctions : टॉप बकेटमध्ये दोन भारतीयांसह चार परदेशी खेळाडू

 नवोदित महिला खेळाडू होण्याचा मान हा थायलंडच्या चानिडा सुथिरयुंग हिला मिळाला आहे. २६ वर्षीय जलदगती गोलंदाजी करणाऱ्या सुथिरयुंगने आयसीसी महिला टी-२० विश्वचषकातील पात्रता फेरीत १२ बली मिळवले होते.