भारतीय महिला क्रिकेट संघाची स्फोटक सलामीवीर स्मृती मानधनाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २ हजार धावांचा टप्पा पार करणारी दुसरी भारतीय क्रिकेटर ठरली. वेस्ट इंडिज महिलांविरुद्धच्या सामन्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात तिने ७४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. या डावात तिने जेमायमा रॉड्रीग्जसोबत १४१ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
कोहलीसोबत खेळलेल्या क्रिकेटर्संना स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक
२३ वर्षीय मानधनाने २ हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी ५१ डाव खेळले. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद २ हजार धावा करणाऱ्या फंलदाजांच्या यादीत ती तिसऱ्या स्थानावर आहे. तिच्यापूर्वी ऑस्ट्रेलियनबेलिंडा क्लार्क आणि मेग लेनिंग यांनी असा पराक्रम केला आहे.
एकदिवसीय सामन्यात मानधनाने ५१ सामन्यात ४३.०८ च्या सरासरीने २ हजार २५ धावा केल्या आहेत. यात ४ शतकांसह १७ अर्धशतकांचा समावेश आहे. मानधनाशिवाय शिखर धवनने एकदिवसीयमध्ये सर्वाधिक जलद २ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने ४८ सामन्यात हा पल्ला गाठला होता.
ऑलिम्पिकमध्ये खेळाडू चमकदार कामगिरी करतील : किरण रिजिजू
या विक्रमासह स्मृती मानधनाने क्रिकेटचा दादा आणि बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगली यांचा विक्रम मागे टाकला. गांगुली यांनी ५२ डावात २ हजारी गाठली होती. नवज्योतसिंग सिद्धू यांनी देखील ५२ डावात २ हजारीचा टप्पा पार केला होता. भारताचा कर्णधार विराट कोहलीने हे लक्ष्य गाठण्यासाठी ५३ वेळा मैदानात उतरला होता.
उल्लेखनिय आहे की, स्मृती मानधना आणि जेमायमा रॉड्रीग्जच्या खेळीच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज महिला संघाला निर्णायक सामन्यात पराभूत करत मालिका २-० अशी खिशात घातली.