पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विराटने शेअर केला फोटो, ट्रोर्ल्सनी म्हटले चलन कापल्यानंतर झाले हे हाल

विराटने शेअर केला फोटो, ट्रोर्ल्सनी म्हटले चलन कापल्यानंतर झाले हे हाल

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली सोशल माडियावर चांगलाच अ‍ॅक्टिव्ह असतो. विंडीजच्या यशस्वी दौऱ्याच्या दोन दिवसानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर केले आहे. त्यावरुन चाहत्यांनी त्याला चांगलेच ट्रोल केले आहे. या छायाचित्रात विराट शॉर्ट्स घालून बसला आहे. चलन कापल्यानंतर विराटचे हे हाल झाले आहेत, अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली आहे. 

भारतात नुकताच वाहतूक नियम मोडल्यानंतर होणाऱ्या दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. त्यानंतर देशभरातून चलन वरुन अनेक प्रकारचे मिम्स व्हायरल होत आहेत. भारताने विंडीज दौऱ्यात तीन-तीन सामन्यांची टी-२० आणि वनडे मालिका आणि दोन कसोटींची एक मालिका खेळली. भारताने या दौऱ्यात एकही सामना गमावला नाही. टी-२० आणि कसोटी मालिकेत भारताने क्रमशः ३-० आणि २-० असा क्लिन स्विप दिला. तर वनडे मालिका २-० ने जिंकली. एक वनडे पावसामुळे रद्द करण्यात आली होती.

विराटने आपले छायाचित्र शेअर करत लिहिले, जोपर्यंत आपण स्वतःमध्ये पाहत नाही, तोपर्यंत आपल्याला बाहेरचे काही पाहण्याची गरज नसते. 

विंडीज दौऱ्यावर विराटबरोबर त्याची पत्नी अनुष्का शर्माही होती. विश्वचषकानंतरचा भारताचा हा पहिलचा दौरा होता. त्यानंतर टीम भारतात परतेल. तिथे दक्षिण आफ्रिकेविरोधात भारत तीन-तीन सामन्यांची टी-२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे.