पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुपर मॉम मेरी कोमचीही ऑलिम्पिकवारी पक्की!

मेरी कोम

सहावेळा जागतिक बाँक्सिंग चॅम्पियन एमसी मेरी कोम (५१ किलो) ने सोमवारी ऑलिम्पिक तिकीट मिळवले. जार्डनची राजधानी अमान येथे सुरु असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीत तिने फिलिपाईन्सच्या आयरिश मेग्नोचा एकहाती पराभूत करत सेमी फायनल गाठताच तिने ऑलिम्पिक कोट्यावर कब्जा केला. तिने ही लढत ५-० अशी एकहाती जिंकली. २०१२ मध्ये मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी मेरी कोम पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे. यावेळीही तिच्याकडून निश्चितच पदकाची अपेक्षा असेल. 

अभिनंदन! अमित पंघलचा ऑलिम्पिक 'पंच'

३७ वर्षीय अनुभवी वॉक्सर आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरीतील सेमीफायनलमध्ये चीनच्या युआन चांगविरुद्ध भिडणार आहे. युआनही माजी ऑलिम्पिक चॅम्पियन असल्यामुळे मेरी कोमची आता ऑलिम्पिकसाठी तयारीच या सामन्याने सुरु होईल. मेरी कोम पूर्वी अमित पंघल (५२ किग्रा), राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता विकास कृष्णन (६९ किग्रा), आशियाई चँम्पियनशिपमधील सुवर्ण पदक विजेती पूजा रानी (७५ किग्रा), लवलीना बोगोर्हेन (६९ किग्रा), आशीष कुमार (७५ किग्रा) आणि सतीश कुमार (९१ किग्रा +) यांनी आशियाई ऑलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेत सेमीफायनलमध्ये प्रवेश करत ऑलिम्पिक कोटा पक्का केलाय.  

...तर IPL सामन्यांसाठी प्रेक्षकांना प्रवेश नसेल!

भारताच्या सात बॉक्सर्संनी सेमीफायनलमध्ये प्रवेश करत ऑलिम्पिक कोटा प्राप्त केला. अमित पंघलने ५२ किलो वजनी गटात कमालीचा खेळ दाखवत सेमीफायनल गाठली. आता तो चीनच्या चीनच्या के हू जियानगुआनशी भिडणार आहे. यापूर्वी रविवार विकासने ६९ किग्रा वजनी गटात तीसऱ्या मानांकित जापानच्या सेवोनरेट्स ओकाजावाला ५-० ने पराभूत करत ऑलिम्पिक कोट्यासह सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. या विजयासह तीन वेळा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा विजय हा दुसरा भारतीय बॉक्सर ठरला आहे. त्याच्यापूर्वी विंजेदरसिंह  तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Six time world champion MC Mary Kom qualifies for Tokyo Olympics by advancing to the Asian Qualifiers semifinal