पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रेयस अय्यर! टीम इंडियाच्या डोकेदुखीवरील जालीम उपाय

पंत आणि अय्यर

विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्या फंलदाजी क्रमवारीत बदल करण्यात यावा, अशी चर्चा जोर धरत आहे. भारताची माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी श्रेयस अय्यरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याचा सल्ला दिला आहे. ऋषभ पंत पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा सूचनाही त्यांनी केली आहे. 

'कोहली वनडे क्रिकेटमध्ये ७५ ते ८० शतकांचा पल्ला गाठेल'

विंडीज विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरने ७१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करुन मध्यफळीतील उणीव भरुन काढल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही काळापासून भारतीय संघाच्या चौथ्या क्रमांकाचा पेच निर्माण झाल्याची चर्चा सुरु आहे. विश्वचषकादरम्यान देखील हा मुद्दा चर्चेत होता. मात्र, संघ व्यवस्थापन आणि कर्णधार विराट कोहलीने चौथ्या क्रमांकासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे सांगितले होते. विश्वचषक स्पर्धेत कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाचा हा विश्वास फोल ठरला होता. 

सेहवाग म्हणतो, कोणी संधी देतं का संधी...मला सिलेक्टर व्हायचंय!

श्रेयस अय्यरची संघात वर्णी लागल्यापासून तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा तर्क लावण्यात येत आहे. विडींजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अय्यर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. सध्या भारतीय संघ चौथ्या क्रमांकाच्या प्रयोगात ऋषभ पंतलाही आजमावून पाहत आहे. मात्र अय्यरच्या दमदार खेळी नंतर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याला बढती मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.