पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकेश राहुल अडचणीत, हे दोन खेळाडू उभे करु शकतात आव्हान

लोकेश राहुल

भारतीय संघातील मधल्या फळतील फलंदाज लोकेश राहुलच्या अडचणी कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यातून स्थान गमावलेल्या लोकेश राहुलला टी-२० सामन्यातही टीम इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नाही.

INDvSA T20 : कोहलीनं रागानं स्टम्प तोडली, व्हिडिओ होतोय व्हायरल

लोकेश राहुलला संघात पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान असेल, असे  भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने  म्हटले आहे. बऱ्याच दिवसांपासून भारतीय संघाच्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजीचा तिढा सोडवण्यात संघ व्यवस्थापन अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले आहे.  गांगुलीने एका वृत्तपत्रामध्ये लिहेलेल्या लेखातून लोकेश राहुलसमोर मोठे आव्हान असल्याचे वर्णन केले आहे.

INDvsSA : विराटशी हस्तांदोलन करण्यासाठी चाहत्याची 'धावपळ'

सध्याच्या घडीला लोकेश राहुलने कसोटी संघातील स्थान गमावले आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतकी खेळी करणाऱ्या मोजक्या फलंदाजात लोकेश राहुलचा समावेश आहे. त्याच्यात उत्तम क्षमता आहे. त्याने मिळालेल्या संधीचं सोन करुन स्वत:ला पुन्हा सिद्ध करावे लागेल. नवोदित मनिष पांडे आणि श्रेयस अय्यर त्याच्यासमोर मोठे आव्हान निर्माण करु शकतात, असा उल्लेखही गांगीलीने आपल्या लेखात केला आहे.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shreyas Iyer and Manish Pandey will challenge KL Rahul for India s No 4 spot thinks Sourav Ganguly