पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धोनीही एका दिवसात तयार झाला नाही, युवीकडून पंतची पाठराखण

ऋषभ पंत आणि महेंद्रसिंह धोनी

भारतीय क्रिकेट निवड समितीने पहिली पंसती दिलेल्या युवा यष्टिरक्षक ऋषभ पंतविषयी सध्या चांगली चर्चा सुरु आहे. विश्वचषकात मिळालेली संधी तसेच विंडीज आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील खराब कामगिरीमुळे तो धोनीचा वारसा सांभाळण्यास परिपक्व आहा का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याला अनेक संधी मिळाल्या असून तो स्वत:ला सिद्ध करु शकलेला नाही त्यामुळे आता त्याचा पर्याय शोधण्याची वेळ आली आहे, अशी चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगण्यास सुरुवात झाली असताना भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने पंतची पाठराखण केली आहे.   

दादा म्हणाला होता, 'कुठंन धरुन आणलय याला!

पंतवर कोणत्याही प्रकारचा दबाव न टाकता त्याची मानसिकता लक्षात घेऊन त्याच्याकडून चांगली कामगिरी करुन घ्यावी लागेल, असे मत युवराज सिंगने व्यक्त केले. युवराज म्हणाला की, पंतला कोणी तरी समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. पंतची धोनीसोबत तुलना करुन नये, असा उल्लेखही युवराजने केला आहे. धोनी एका दिवसात सर्वोत्तम खेळाडून बनलेला नाही. त्यासाठी अनेक वर्षे लागली. त्यामुळे त्याचा पर्याय निवडण्यासही वेळ लागेल. 
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी आता एक वर्ष बाकी आहे. पंतकडून सर्वोत्तम कामगिरी करुन घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. दबाव निर्माण करुन आपण त्याच्याकडून चांगली कामगिरी करुन घेऊ शकत नाही, असेही युवराजने सांगितले.  

VIDEO : चाहतीने I Love You ऋषभ म्हटल्यावर पुढे काय झाले पाहा...

पंतला अनेक संधी दिल्या जात आहेत. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये तो ज्याप्रमाणे बाद झाला त्यावरुन त्याच्या अपरिपक्वतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी पंतला अल्टिमेटम दिले आहे. याशिवाय भारतीय निवड समितीने यष्टिरक्षक फलंदाजाच्या रुपात पर्यायी खेळाडूचा शोध सुरु असल्याचे देखील स्पष्टपण सांगितलो आहे.