पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड -१९: मदत निधीसाठी भारत-पाक यांच्यात मालिका खेळवावी : अख्तर

शोएब अख्तर

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने भारत-पाक यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवण्यासंदर्भातील भावना व्यक्त केलीय. भारत-पाक यांच्यात मालिका खेळवून कोरोनासाठी निधी जमा करावा, असा उल्लेख विचार त्याने बोलून दाखवला आहे. भारत-पाक सामन्यातून दोन्ही राष्ट्रांना आवश्यक असणारा निधी जमा होईल, असे त्याने म्हटले आहे.

लॉकडाऊनमध्ये BCCI कडून केंद्र सरकारला अशीही मदत

भारत-पाक यांच्यातील तणावामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय क्रिकेट बऱ्याच वर्षांपासून स्थगित आहे. २०१२-१३ मध्ये या दोन्ही राष्ट्रांमध्ये आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आली होती. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेच दोन्ही संघ आमने सामने खेळताना दिसले आहेत.  अख्तरने म्हटलंय की, जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात यावी. ज्यासाठी मालिका खेळवायची आहे ते कारणावर दोन्ही देशामध्ये एकमत होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय.

सुनील गावसकरांची ५९ शतके, कोरोनासाठी केली ५९ लाखांची मदत

या मालिकेत विराट कोहलीच्या शतकावर आम्ही टाळ्या वाजवू आणि बाबर आझमने शतक साजरे केल्यावर तुम्ही आनंद साजरा करा, असा उल्लेखही अख्तरने केलाय. भारत-पाक मालिकेला चांगला प्रतिसाद मिळेल. त्याचा कोरोनाचे संकट दूर करण्यास मदत होईल, असेही तो म्हणाला. सध्याच्या घडीला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारचे खेळ बंद आहेत. अख्तरच्या प्रस्तावावर कसा विचार होणार हे येणारा काळच ठरवेल. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Shoaib Akhtar proposes Indo Pak series to raise funds for fight against COVID 19 pandemic India vs Pakistan ind vs pak