पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्वॉरंटाईन असलेल्या धवनने शेअर केला Video

शिखर धवनने क्वारंटाईन सेंटरमधील व्हिडिओ शेअर केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून परतलेल्या नागरिकांना  विलगिकरण कक्षात (क्वॉरंटाईन) निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ७० किमी अंतरावर विलगिकरण कक्ष उभारण्यात आला आहे. भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज शिखर धवन जर्मनीहून परतल्यानंतर त्याला क्वॉरंटाईन करण्यात आले. 

कोरोना विषाणूमुळे राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित

दिल्लीतील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भारत सरकारकडून चांगली सुविधा पुरवण्यात येत असल्याची माहिती धवनने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. शिखर धवनने फेसबुकवरुन यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला असून व्हिडिओच्या माध्यमातून त्याने प्रशासन आणि सरकारचे आभार मानले आहेत. 

कोरोनावर खासगी रुग्णालयातही उपचार घेता येतील - आरोग्यमंत्री

मी नुकताच जर्मनीहून दिल्लीला परतलो आहे. दिल्ली विमानतळापासून ७० किमी अंतरावर परदेशातून आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन  करण्यात येत आहे. याठिकाणी प्रत्येकाला स्वतंत्र खोली देण्यात येत असून प्रशासन आणि पोलिस उत्तमरित्या कर्तव्य बजावताना पाहायला मिळाले. जेवणापासून इतर आवश्यक सुविधा देखील उत्तमरित्या उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती धवनने फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे. 

असा असेल घरी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तीच्या हातावरील शिक्का

कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात प्रभावीत असणाऱ्या अव्वल दहा राष्ट्रांमध्ये जर्मनीचा समावेश आहे. जर्मनीमध्ये ७ हजार २०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली असून याठिकाणी आतापर्यंत १७ जणांनी आपला जीव गमावला आहे. धवन नुकताच जर्मनीतून दिल्लीला पोहचला असून त्यालाही इतर प्रवाशांसह क्वॉरंटाईन प्रक्रियेतून जावे लागले.