पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धवनच्या पोस्टमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे अधिकारी अडचणीत

धननच्या या फोटोमुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पृथ्वी शॉच्या निलंबनाच्या कारवाईनंतर त्याला राष्ट्रीय अकादमीत सराव करता येईल का? या प्रश्नावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) च्या कार्यकारी अधिकारी तूफान घोष यांनी मौन बाळगले आहे. भारतचा सलामीवीर शिखर धवन याने  १७ जूलैला एक फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता. या फोटोत पृथ्वी शॉ, धवन आणि उमेश यादव एकत्र दिसले होते.  

टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी २ हजार अर्ज

बीसीसीआयने  शॉ ला १६ जूलैलाच डोपिंग चाचणीत दोषी आढळल्याच्या प्रकरणात निलंबित केले होते. मग १७ जूलैला पृथ्वी शॉ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव कसा करत होता? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या प्रश्नावर घोष यांनी मौन बाळगले आहे. 

मी फक्त संघासाठी नव्हे तर देशासाठी खेळतो : रोहित शर्मा

आयएएनएस वृत्तसंस्थेने फोनच्या माध्यमातून त्यांच्याशी या मुद्यावर संवाद साधला. या वेळी  ते म्हणाले की, या मुद्द्यावर मी काहीही बोलू शकत नाही. याच योग्य उत्तर तुम्हाला बीसीसीआयचं देऊ शकेल. बीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी यांनी पृथ्वीच्या निलंबनासंदर्भातील माहिती दिली होती का? या प्रश्नावर त्यांनी कॉल कट केला. धवनच्या पोस्टमुळे निलंबनानंतर पृथ्वी राष्ट्रीय अकादमीमध्ये कसा या प्रश्नासह  राष्ट्रीय अकादमीचा भोंगळ कारभार सुरु आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: shikhar dhawan photo with prithvi shaw and umesh yadav creates problem for coo of national cricket academy