पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून शिखर धवन त्याचे केस वाढवत नाही

शिखर धवन

कोरोना विषाणूमुळे सध्याच्या घडीला सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळतोय. कोरोनाविरोधातील सामना जिंकण्याठी गर्दी टाळून घरात बसण्याचा सल्ला सरकार आणि प्रशासनाने नागरिकांना दिलाय. एवढेच नव्हे तर कोरोना विषाणूचा वेगाने होणारा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतून देशव्यापी लॉकडाऊनची कठोर भूमिकाही सरकारने घेतली आहे. 

लॉकडाऊन : आता रोहितच्या सुपर हिट इन्स्टा शोमध्ये दिसणार हा खेळाडू

दरम्यानच्या काळात घरातील कोंडमाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी खेळाडू आणि सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक्टिव्ह दिसत असून यात भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनही चांगलाच फॉर्ममध्ये आहे.शिखर धवनने पत्नीसोबत असणारा घरात काम करतानचा व्हिडिओ यापूर्वी शेअर केला होता. या व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगल्याचेही पाहायला मिळाले. 

रत-पाक यांच्यातील मालिकेवर दिग्गज क्रिकेटरची तिखट प्रतिक्रिया

त्यानंतर आता धवनने आपल्या चाहत्यांना आणखी एक गुपित सांगितले आहे. शिखर धवनने नुकचा इन्टा चॅटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी एका चाहत्याने तू डोक्यावरील केस का वाढवत नाहीस? असा प्रश्न विचारला होता. यावर धनवने आपल्या अंदाजात उत्तर दिले. केसांशिवायचा माझा लूक अधिक शोभनिय वाटतो.  आणि शॅम्पू देखील कमी लागतो, अशा विनोदी अंदाजात त्याने आपल्या चाहत्याच्या मनातील तिढा सोडवला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shikhar dhawan jo poochhna hai poochho session on instagram revealed why he prefer head shave