क्रिकेटपटू शिखर धवन सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. सातत्याने तो नवनवे व्हिडिओ करुन सोशल मीडियावर टाकत असतो. लॉकडाऊनमुळे घरी असलेला शिखर आता एक नवा व्हिडिओ टाकून पुन्हा चर्चेत आला आहे. विशेष म्हणजे त्याने यावेळी व्हिडिओत आपल्या पत्नीलाही सहभागी करुन घेतले आहे. व्हिडिओत शिखर पत्नी आयशाबरोबर जुन्या काळातील अभिनेता जितेंद्र यांच्या एका सुपरहिट गाण्यावर नृत्य करताना दिसतोय.
... आणि कोरोना प्रतिबंधक प्रोटेक्टिव्ह सूट्सचे उत्पादन देशात झाले सुरू
कोविड-१९ मुळे संपूर्ण जगातील हालचालींना ब्रेक लागला आहे. अशावेळी आपल्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवत असलेल्या शिखरचा हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी घरात कपडे धुतानाचा त्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यावेळी त्याने 'जब से हुई है शादी, आंसू बहा रहा हूं...' हे गाणे बॅकग्राऊंडला लावले होते.
आता ताज्या व्हिडिओत तो जितेंद्र झाल्याचे दिसतो. पत्नी आयशाबरोबर 'ढल गया दिन, हो गई शाम' वर तो नृत्य करताना दिसतोय. धवनने जितेंद्र यांच्यासारखेच कपडे घालून तसाच नाचताना दिसतोय. तर आयशानेही लीना चंदावरकर यांच्याप्रमाणे नृत्य केले आहे. हा व्हिडिओही मोठ्याप्रमाणात पाहिला जात आहे.
कोरोना विषाणू ट्रॅकर अॅप 'आरोग्य सेतू' डाऊनलोड करा आणि सुरक्षित राहा
हमजोली या चित्रपटात जितेंद्र आणि लीना चंदावरकर यांनी बॅडमिंटन खेळत 'ढल गया दिन, हो गई शाम' या गाण्यावर नृत्य केले होते. परंतु, शिखर आणि आयशा यांनी टेबल टेनिस खेळत नृत्य केले आहे.