पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिखर-श्रेयस अय्यरचा VIDEO पाहिल्यास हसू आवरणार नाही

श्रेयस अय्यर आणि शिखर धवन

India vs West Indies, ODI Series, Shikhar Dhawan Shreyas Iyer: टीम इंडिया सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. त्यानंतर भारत आणि विंडीज दरम्यान दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. टी २० च्या तीन सामन्यांची मालिका भारताने ३-० अशी जिंकली. पण पहिली वनडे १३ षटकांच्या खेळानंतर पावसाच्या पाण्यात वाहून गेली. आता दुसऱ्या वनडेची प्रतिक्षा आहे. याचदरम्यान भारतीय खेळाडू कॅरेबियन बेटावर मौज-मस्ती करताना दिसत आहेत. 

सुरेश रैनावरील शस्त्रक्रियेनंतर जाँटी ऱ्होड्सचे हृदयस्पर्शी टि्वट

भारतीय खेळाडूंचा हा विरूंगळा सुरु असतानाच सलामीवीर शिखर धवन आणि श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत दोघांकडे माऊथ पीस असून त्यांना काही डायलॉग म्हणण्याचे आव्हान देण्यात आले होते. यातील काही शब्द बोलताना आणि ऐकण्यास खूप कठीण होते. त्यामुळे हे ऐकताना अत्यंत मजा येते.

सर्वांत आधी शिखर धवनने हे आव्हान स्वीकारले होते. धवनने काही ओळी आणि डायलॉग्ज अय्यरला समजवून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हेच काम अय्यरने केले. या आव्हानाला 'स्पीक आउट' आव्हान असे नाव देण्यात आले. हा अत्यंत मजेशीर खेळ होता. यापूर्वी काही अशाच प्रकारचे खेळ रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी खेळले होते.

विश्वचषकात जायबंदी झाल्याने बाहेर पडलेल्या शिखरने विंडीज दौऱ्यातून पुनरागमन केले आहे. त्याने आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात शानदार शतक ठोकले होते. पण बोटांच्या दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली होती. विंडीजबरोबर ३ टी २० सामन्यात शिकर अपयशी ठरला आणि पहिल्या वनडेमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. तर श्रेयस अय्यरला टी २० मध्ये संधी नाही मिळाली. पहिल्या वनडेत त्याचा समावेश करण्यात आला होता. पण पावसामुळे हा सामना होऊ शकला नाही.