पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कॅरेबियन क्रिकेटरचा धोनीला सलाम

वेस्ट इंडिजच्या खेळाडूचा धोनीच्या कार्याला सलाम

वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज शेल्डन कोट्रेलने टीम इंडियाचा माजी कर्णधा महेंद्रसिंह धोनीच्या देश प्रेमाला सलाम केला आहे. त्याने धोनीच्या लष्करासोबत काम करण्याच्या निर्णयाचे कौतुकही केले आहे. विंडीज दौऱ्यावरुन माघार घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी लष्करी प्रशिक्षण घेत आहे.  ३१ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान धोनी काश्मीरमध्ये लष्करी ताफ्यासह देशसेवेत काही काळ व्यतीत करणार आहे.  

धोनीच्या या निर्णयानंतर कोट्रेलने ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेटच्या मैदानातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व सच्चा देशभक्त या शब्दांत कोट्रेलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्विटमध्ये त्याने धोनीचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. 

 

रोहितसोबत कोणतेही मतभेद नाहीत : विराट कोहली

३८ वर्षीय धोनी पॅराशूट  रेजिमेंट (१०६ पॅरा टीए बटालियन) सोबत प्रशिक्षण घेत आहे. धोनीला २०११ मध्ये पॅराशूट रेजिमेंटकडून ‘मानद लेफ्टनंट कर्नल’ किताब देण्यात आला होता. २०१५ मध्ये आग्रा येथील पॅरा रेजिमेंट येथील प्रशिक्षणामध्ये लष्करात कार्यरत होण्याची पात्रता सिद्ध केली होती. क्रिकेट सोडल्यानंतर लष्करात सक्रिय होण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली होती. विश्वचषकानंतर विंडीज दौऱ्यावर उपलब्ध नसल्याचे जाहीर केल्यानंतर धोनी सध्या लष्करी ताफ्यात दाखल झाला आहे.