पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

युवा टेनिस स्टारकडून जोकोविचचा धक्कादायक पराभव!

नोवाक जोकोविच

शंघाई मास्टर्स स्पर्धेत ग्रीसच्या सहाव्या मानांकित स्टेफानोस सितसिपासने जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला. शुक्रवारी रंगलेल्या उपांत्यपूर्वी फेरीत त्याने जोकोविचला ३-६,७-५,६-३ असे पराभूत केले. या दिमाखदार विजयानंतर उपांत्यफेरीत तो निश्चितच आत्मविश्वासने मैदानात उतरेल.  

टीम इंडियाने महाराजला चांगलेच धुतले!

उपांत्य फेरीत त्याची लढत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवविरुद्ध रंगणार आहे. रशियन डॅनिलने इटलीच्या फाबियो फोगनिनिला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने ६-३, ७-६ (४) अशा फरकाने विजय नोंदवला होता.  

विजय हजारे चषक: संजू सॅमसनची विक्रमी द्विशतक

टेनिस कारकिर्दीतील मोठ्या विजयानंतर टेनिसच्या जागतिक क्रमवारीत सातव्या क्रमांकावर असलेल्या  स्टेफानोसच्या खेळीचे खुद्द जोकोविचने कौतुक केले. जोकोविच म्हणाला की,  'स्टेफानोस सर्वोच्च दर्जाचा खेळाडू आहे. सर्विसनंतर तो अधिक आक्रमक अंदाजात खेळतो. मी त्याला बचावात्मक खेळण्याची संधी दिली नाही. पण त्याने चांगला खेळ दाखवला.