पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वॉटसन धोनीलाही रामराम करणार?

शेन वॉटसन

आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या शेन वॉटसनने ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग (बीबीएल) मधून निवृतीची घोषणा केली आहे. २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन अष्टपैलू इंडियन प्रीमिअर लीग, पाकिस्तान सुपर लीग आणि ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या बिग बॅश लीगमध्ये सिडनी थंडर संघाकडून खेळत होता. कुटुंबियांसोबत अधिक वेळ घालवता यावा, यासाठी निवृत्ती घेत असल्याचे वॉटसनने म्हटले आहे. त्याच्या या निर्णयानंतर आयपीएलमध्ये तो चेन्नईसोबत आणखी किती वेळ दिसणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल.

मागील चार वर्षांपासून वॉटसन सिडनी थंडर संघातून खेळत होता. २०१६ मधील बिग बॅश लीगच्या हंगामातील विजेतेपदासह अनेक चांगल्या आठवणी माझ्याकडे आहेत, असे वॉटसनने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर म्हटले आहे. ३७ वर्षीय वॉटसनने सिडनी थंडरचे नेतृत्व देखील केले आहे. या संघाकडून खेळताना त्याने तब्बल १०१४ धावा केल्या आहेत. सिडनी थंडर या संघाकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे.  

सध्याच्या घडीला वॉटसन महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सच्या संघातून  इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या सनराइजर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात वॉटसनने ९६ धावांची धमाकेदार खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला होता.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: shane watson sydney thunder big bash league chennai super kings shane watson announced retirement from bbl