पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड-१९ : शेन वॉर्नने घेतली ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांची फिरकी!

शेन वॉर्न

जगभरात कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन भारतामध्ये लॉकडाऊनचा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. युरोपातील अनेक राष्ट्रांनी देखील जीवघेण्या कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. पण ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी देखील देशातील काही गाष्टींवर निर्बंध घातले आहे. यासंदर्भात त्यांनी देशवासियांना संबोधितही केले. पण त्यांचे भाषण हे गोंधळात टाकणारे होते, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.  

लॉकडाऊन: १४ एप्रिलपर्यंत सर्व गाड्या रद्द, रेल्वेचा मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित करताना संभ्रमित वक्तव्य केल्याचे दिग्गज क्रिकेटर शेन वॉर्नने म्हटले आहे. जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले असून आता ऑस्ट्रेलियात पूर्णपणे लॉकडाऊनची वेळ आली आहे.  पंतप्रधानांनी लॉकडाऊन संदर्भातील भाषण हे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे होते.  सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि कोणत्या नाहीत याबाबत कोणतीही स्पष्टता पंतप्रधानांच्या भाषणातून होत नाही.  

कोरोना इफेक्ट : ... या मोबाईल हँडसेटचे लाँचिंगही गेले पुढे

ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांच्या भूमिकेवर आक्षेप घेणारा शेन वॉर्न हा एकटा नाही. सध्याच्या ऑस्ट्रेलियन कर्णधार एरॉन फिंच याने देखील पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पंतप्रधानांच्या भाषणामुळे मी गोंधळून गेलोय, अशी प्रतिक्रिया फिंचने दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियात अनेक दुकाने, शॉप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी शाळा मात्र सुरुच आहेत. या निर्णयासंदर्भातही येथील नागरिकांमध्ये नाराजी आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shane Warne and Aaron Finch left confused after Australia PM Scott Morrison Covid 19 presser