पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून सचिन-धोनीपेक्षा आफ्रिदीची विराटला पसंती

आफ्रिदी आणि सचिन तेंडुलकर

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनीला आपल्या संघात न घेण्याचे कारण स्पष्ट केले आहे. आगामी विश्वचषकापूर्वी शाहिद आफ्रिदीने विश्वचषकासाठी त्याला सर्वोत्कृष्ट वाटणाऱ्या खेळाडूंचा संघ निवडला होता. आपल्या या 'ऑल टाइम वर्ल्ड कप इलेव्हन'मध्ये त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीला संधी दिली. पण विक्रमादित्य सचिन तेंडुलकर आणि धोनीला मात्र स्थान दिले नव्हते. 

आपल्या संघ निवडीमध्ये सचिन आणि धोनीला संघात स्थान देण्याएवजी विराटला स्थान देण्याचे खास कारणही आफ्रिदीने सांगितले आहे. याबद्दल आफ्रिदी म्हणाला की, सचिन आणि धोनी हे चांगले क्रिकेटर्स आहेत. त्यांनी भारतीय संघाकडून खेळताना यशाची अनेक शिखरे गाठली. पण विराट कोहलीचा राजेशाही थाटातील खेळ पाहणे अधिक आनंददायी वाटते. सचिन-धोनीबद्दल तो म्हणाला की, सईद अन्वर आणि अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांना सलामीवीर म्हणून निवडल्यामुळे माझ्या संघात सचिन-धोनीला स्थान मिळू शकले नाही.

मॉर्गनची फटकेबाजी, 'विराट पेक्षा रुटच भारी'

ऑस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक आणि सलामीवीर अ‍ॅडम गिलख्रिस्टला आणि पाकिस्तानचा स्फोटक फलंदाजांना शाहिद आफ्रिदीने आपल्या संघात सलामीवीर म्हणून पसंती दिली होती. तर पॉन्टिंगनंतर चौथ्या स्थानावर त्याने विराटला ठेवले आहे.

शाहिद आफ्रिदीचा ऑल टाइम वर्ल्ड इलेव्हन :
 सईद अन्वर, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, रिकी पॉन्टिंग, विराट कोहली, इंझमाम उल-हक, जॅक कॅलिस, वासिम आक्रम, ग्लेन मॅग्रा, शेन वॉर्न, शोएब अख्तर, सकलेन मुस्ताक 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shahid Afridi reveals why he chose Virat Kohli over Sachin Tendulkar and MS Dhoni in his all time World Cup XI