पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भारत-पाक तणावाच्या परिस्थितीत आफ्रिदी LOC दौरा करणार

शाहिद आफ्रिदी

जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानी नेत्यांनंतर आता खेळाडू देखील या मुद्द्यावरुन मैदानात उतरले आहेत. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने ट्विटच्या माध्यमातून काश्मीरच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया दिली आहे. 'आपले काश्मीर' मोहिमेअंतर्गत तो पाकिस्तानी जनतेला एकत्रित येण्याचे आव्हान करत आहे.   
आफ्रिदीने ट्विटमध्ये लिहलंय की, येत्या शुक्रवारी दुपारी तो मजार-ए-कैद या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख केला आहे. यासोबतच त्याने काश्मीर बांधवांसोबत असल्याची भावना व्यक्त करत पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्यासोबत उभे रहावे, असे आवाहन देखील केले आहे.  

भारतीय सैन्याकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या गोळीबारात मृत पावलेल्या कुटुंबियांचा उल्लेख करत त्याने नियंत्रण रेषेजवळील भागचा दौरा करणार असल्याचेही जाहीर केले आहे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियादाद यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून काश्मीरी बांधवांसोबत असल्याची भावना व्यक्त केली आहे. 
मियादाद यांनी व्हिडिओ शेअर करत नियंत्रण रेषेच्या परिसरातील दौऱ्यात सहभागी होऊन शांतीचा संदेश देणार असल्याचे म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील कोणताही मुद्दा शांतीच्या मार्गाने सोडवला जावा, अशी भावनाही मियादाद यांनी व्यक्त केली आहे.  

जम्मू-काश्मीरः अपहरण करुन दहशतवाद्यांनी केली एकाची हत्या

दरम्यान पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याचा सूरात सूर मिसळत काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या साधारण सभेत उपस्थित करणार असल्याचे भाष्य केले आहे.