पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

IND A vsWI A: नदीमचा पाचव्यांदा दहा गडी तंबूत धाडण्याचा पराक्रम

नदीम

India A vs West Indies A 1st Unofficial Test: भारत अ क्रिकेट टीमने वनडे मालिका ४-१ अशी खिशात घातल्यानंतर पहिल्या अनाधिकृत कसोटीही विजयी मोहर उमटवली. या विजयासह तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत अ संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात भारताचा डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीमने एकूण १० गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. 

या कामगिरीबद्दल त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.  या सामन्यातील दोन्ही डावात मिळून नदीमने प्रत्येकी  ५-५ बळी मिळवले. पहिल्या डावात नदीमने ६२ धावा खर्च करुन ५ बळी मिळवले तर दुसऱ्या डावात त्याने अवघ्या ४७ धावा खर्च करत ५ बळी मिळवण्याचा पराक्रम केला. 

विंडीज दौऱ्यापूर्वी कोहली पत्रकार परिषद घेणार नाही

एका सामन्यात १० बळी मिळवण्याचा पराक्रम त्यान पाचव्यांदा केला आहे. आतापर्यंत खेळलेल्या १०७ सामन्यात त्याने १८ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक बळी टीपले आहेत.  
 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: shahbaz nadeem man of the match with 10 wickets in india a vs west indies a 1st unofficial test