ऑस्ट्रेलियन सलामी फलंदाज बेथ मूनी आणि एलिसा हिलीने दमदार अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला सुरुवातीलाच बॅकफूटवर आणून ठेवले. त्यानंतर चार विकेट घेत मेगनने भारताच्या डावाला सुरुंग लावत पहिल्या विश्वचषक विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. महिला टी-२० स्पर्धेत ज्या शेफालीवर भारताची भिस्त होती ती फायनलमध्ये संघाला चांगली सुरुवात करुन देऊ शकली नाही. मोक्याच्या क्षणी ऐतिहासिक पर्वणीला मुकल्याचं तिला रडू कोसळल्याचे पाहायला मिळाले.
It's ok Shafali verma, you've achieved more than what a 16 year old can do 🔥🔥 don't be sad 😭😭 We are proud you #shafaliverma #T20WorldCup #INDvAUS #TeamIndia pic.twitter.com/c4Pdxi2ryE
— AVI♥️NASH (@avi__n__ash) March 8, 2020
INDvs Aus: क्रिकेट जगतात ऑस्ट्रेलियन महिलाच ठरल्या भारी!
शेफाली वर्माच्या दमदार खेळीच्या जोरावरच भारताने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र अंतिम सामन्यात पहिल्या षटकातच अवघ्या दोन धावा करुन माघारी फिरली. ब्रेटलीच्या सल्ल्यानुसार, तिला लवकर बाद करत ऑस्ट्रेलियन महिलांनी विजयाचा मार्ग मोकळा केला होता. साखळी सामन्याप्रमाणे अंतिम सामन्यात न खेळता आल्याने ती चांगलीच भावूक झाली.
INDvs SA ODI: पांड्या-धवनचे कमबॅक रोहितला विश्रांती
बाद होऊ ज्यावेळी ती संघाच्या ताफ्यात पोहचली तेव्हाच तिला अश्रू अनावर झाले. सोशल मीडियावर शेफालीचा अश्रू अनावर झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. २०१९ मध्ये भारतीय संघाला विश्वचषकाच्या सेमीफायनमध्ये गाशा गुंडाळावा लागल्यानंतर रोहित शर्माची जी अवस्था झाली होती. तिच अवस्था १६ वर्षीय शेफालीची झाल्याचे व्हिडिओ आणि व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये संघ सहकारी तिला सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचेही दिसते.